
राज्यातील विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारणार-ना.उदय सांमत
राज्यातील सर्व विद्यापीठांमध्ये कोरोना तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहेत. सध्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे ही प्रयोगशाळा सुरू झाली आहे. याशिवाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद आणि संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती येथील प्रयोगशाळेचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कोरोना विषाणूशी लढा देण्यासाठी व्हेंटिलेटर तयार केले असून ते लवकरच पाच रुग्णालयांमध्ये वापरले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले.
www.konkantoday.com