डॉक्टरांनी वाचवले सर्पदंश झालेल्या महिलेचे प्राणघातक
राजापूर ग्रामीण रूग्णालयात सर्पदंश झालेल्या महिलेची प्रकृती चिंताजनक झाली असतानाच डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या महिलेचे प्राण वाचले आहेत.राजापूर तालुक्यातील राजश्री परवडी या महिलेला शेतात गेली असता त्यांना सर्पदंश झाला सर्प विषारी असल्याने तिच्या अंगात विष बनू लागले होते त्यामुळे तिला तात्काळ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. विष अंगात भिनल्याने तिला सर्पदंशावरील इंजेक्शन देणे गरजेचे होते त्या काळातच महिलेचा रक्तदाब वाढल्याने इंजेक्शन दिल्यानंतर ही महिला निपचित पडली तीचे हृदयाचे ठोके काही काळ बंद पडले त्यावेळी रुग्णालयात उपस्थित असलेले डॉक्टर राम मिस्त्रीं व त्यांच्या सहकार्यांनी रुग्णांकडे धाव घेतली. डॉक्टर मिस्त्री यांनी सदर महिलेवर सीपीआर पद्धतीचा म्हणजे हृदयावर दाब देऊन श्वास सुरू करण्याची प्रक्रिया केली.ही प्रक्रिया तातडीने व योग्य पद्धतीने करण्याची गरज असते ही प्रक्रिया केल्यानंतर काही क्षणात सदर महिलेचा श्वास पुन्हा सुरू झाला.यामुळे सर्वानी निश्वास सोडला सदर महिलेवर तातडीने पुढील उपचार करण्यात आले.या महिलेला अधिक उपचारासाठी शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर राम मिस्त्री, डॉक्टर रूपेश वाईट, डॉक्टर मिनाक्षी शिंदे, डॉक्टर अमृता शेंबवणेकर व त्यांच्या सहकार्यानी दाखवलेल्या तत्परतेबद्दल कौतुक करण्यात येत आहे.
www.konkantoday.com