जिल्ह्यात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपतर्फे निवडणूक लढविण्यास अनेकजण इच्छूक
रत्नागिरी:आगामी विधानसभा निवडणुकीत युती झाली नाही तर भाजपने स्वबळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू केली असून त्याचाच एक भाग म्हणून प्रदेश सरचिटणीस आमदार सुरेश हाळवणकर यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपची उमेदवारीसाठी इच्छूक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. रत्नागिरी जिल्ह्यात पाच मतदारसंघात २९ जण इच्छूक असल्याने त्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने उमेदवारीसाठी विकास सावंत, दत्ता देसाई, अशोक मयेकर, सुभाष गराटे, डॉ. नईदा शेख, राजेश मयेकर, भाई जठार हे इच्छूक आहेत. चिपळूण विधानसभा मतदारसंघातून माजी उपाध्यक्ष रश्मी कदम, माजी सभापती निलम गोंधळी, चिपळूणच्या नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, तुषार खेतले, विजय चितळे, प्रमोद अधटराव, रामदास राणे, घोसाळकर आदीजण इच्छूक आहेत. तर गुहागर विधानसभा मतदारसंघातून डॉ. विनय नातू, रामदास राणे, प्रशांत शिरगांवकर, दापोली विधानसभा मतदारसंघातून केदार साठे, शशिकांत चव्हाण, आबा जोशी, तर राजापूर विधानसभा मतदारसंघातून उल्का विश्वासराव, प्रसाद पाटोळे, ऍड. विजय गांगण, संतोष गांगण, अनिल कनगुटकर आदींनी मुलाखती दिल्या.
www.konkantoday.com