
चिपळूण बसस्थानकात चोरट्यांचा मुक्काम ,आणखी एका महिलेचे दागिने लांबविले
चिपळूण स्थानकातून दोणवली बसमध्ये चढत असताना भोममधील एका महिलेची पर्स लांबवून पावणेदोन लाखाचे दागिने चोरटय़ानी लांबवल्याची घटना घडली असतानाच आणखी एका महिलेचे दीड ते दोन लाखांचे दागिने व पैसे लांबवल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही महिला दोणवली गाडीत चढत असताना हा प्रकार घडला आहे.गर्दीचा फायदा घेऊन चोऱ्या करणारे चोरटे पोलिसांच्या अद्यापही ताब्यात आलेले नाहीत.हर्णे येथील राहणाऱ्या वर्षा चंद्रकांत पडवळ या महिला आपल्या मुलांसह हर्णे येथून चिपळूण बसस्थानकात आल्या. गावाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना अज्ञात चोरटय़ानी त्यांच्या खांद्याला लावलेल्या बॅगची चैन उघडून त्यामधील पर्स व दागिन्याच्या छोटा डबा चोरला. पर्समधील पाच तोळ्याचे दागिने व अकरा हजार रुपये अशी रक्कम चोरून नेली यामुळे या स्थानकावर चोरट्यांचा वावर सुरू असून ते पोलिसांच्या ताब्यात मिळत नसल्याचे चोरीच्या घटनांवरून उघड होत आहे.
www.konkantoday.com