
गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विकास कामात घोळ ?चौकशी होणार
रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाची असणार्या गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांमध्ये घोळ झाल्याचा आरोप पंचायत समितीच्या मासिक सभेत करण्यात आला. पंचायत समिती सदस्य गजानन पाटील यांनी गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबाबत सभेत मुद्दा उपस्थित केला. ग्रामपंचायतीने केलेले गटारे,पाखाडी ,पथदीप, स्मशानभूमीच्या अदी कामात घोळ झाला आहे. कामे अपुरी असून देखील कंत्राटदारांना पैसे देणे झाले आहेत. असे आरोप सभेत करण्यात आले यामुळे आता या विषयावर पडताळणी करून आणि अनियमिता व अपहार आढळल्यास संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले.
www.konkantoday.com