कोकणात येणारी एसटी बस जळून खाक,५७ प्रवासी थोडक्यात बचावले
मुंबई-गोवा महामार्गावर एसटी बसने पेट घेतली. वडपाले येथे सकाळी 6.45 वाजण्याच्या सुमारास एसटी बस जळून खाक झाली.या बस मध्ये ५७ प्रवासी होते.सुदैवाने या दुर्घटनेत एकाही प्रवाशांला दुखापत झाली नाही. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार इचलकरंजी आगाराची कोल्हापूर विभाग बस क्रमांक MH 20 BL 4209
ही बस परळहून (मुंबई)चिपळूणला(सावर्डे) निघाली होती. बस वडपाले गावाच्या हद्दीत आली असती तिने अचानक पेट घेतला.यावेळी महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली.
बसला आग कशामुळे लागली याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
www.konkantoday.com