
भाजपच्या सर्व्हेत युतीला विधानसभा निवडणुकीत मोठे यश
मुंबई: लोकसभा निवडणुकांपाठोपाठ महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही महायुतीला निर्भेळ यश मिळण्याचे स्पष्ट संकेत दिसून आले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आले होते. यामध्ये महायुतीला विधानसभेच्या २८८ पैकी २२९ जागांवर विजय मिळेल, असा निष्कर्ष समोर आला आहे.




