
शेअर रिक्षाला मान्यता देऊन जिल्हाधिकार्यांची रत्नागिरीकरांना भेट
कोकण रेल्वेच्या मुंबईतून रत्नागिरीत येणार्या पॅसेंजर गाडीचे तिकीट देखील रेल्वे स्टेशनपासून रत्नागिरीत येणार्या रिक्षाच्या भाड्यापेक्षा स्वस्त आहे.कोकण रेल्वेपासून रत्नागिरी शहरात येणाऱ्या रिक्षाचे भाडे अव्वाच्या सव्वा असून नाईलाजास्तव प्रवाशांना रिक्षातून प्रवास करावा लागत होता. रत्नागिरीचे धडाडीचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी रत्नागिरी शहरात शेअर रिक्षाला मान्यता दिली आहे.कोकण रेल्वे स्टेशनपासून रत्नागिरीत येणार्या प्रवाशांना शेअर रिक्षाने प्रवास करता येणार आहे.यामुळे त्यांच्या भाड्याचे ओझे कमी होणार आहे.शहरात विविध भागातही अधिकृत शेअर रिक्षा सुरू करण्यात येणार असल्यामुळे तीन प्रवाशांमध्ये हे भाडे विभागाले जाणार असल्यामुळे कमी पैशात नागरिकांना रिक्षाने प्रवास करणे सोयीचे होणार आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आजपासून शेअर रिक्षाला मान्यता दिली आहे. शहरात आजपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. शेअर रिक्षासाठी भाडे निश्चित करण्याचे आदेश उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
www.konkantoday.com