विवाहितेवर हल्ला करणारा अल्पवयीन तरुण
टीआरपी नजीक विवाहितेवर हल्ला करणारा तरुण अल्पवयीन असून त्याने कौटुंबिक वादातून सदर महिलेवर हल्ला केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.आरोपी तरुणाच्या वडिलांच्या अनैतिक संबंधाच्या संशयामुळे घरात या तरुणाचे वडील आई यांच्यात वाद सुरू होते. त्यात हल्ला झालेल्या फिर्यादी तरुणीने या तरुणाच्या आईशी वाद केला होता.आरोपी अल्पवयीन तरुणाचे वडील व फिर्यादी एकाच ठिकाणी कामाला जात होते.या दोघांमध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय तरुणाच्या आईला होता.या रागातून आरोपी अल्पवयीन तरुणाने सदर महिलेला गाठून तिच्यावर कोयत्याने डोके, हात, मान व पोटावर वार केले होते.या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.तिने दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन तरुणाला अटक करण्यात आले आहे.
www.konkantoday.com