रत्नागिरीतील सुप्रसिद्ध परकार हॉस्पिटलचे डॉ. मतीन परकार यांना कार्डिओलॉजी विषयांमध्ये पीएचडी प्राप्त

रत्नागिरीतील सुप्रसिद्ध डॉ. मतीन परकार यांना कार्डिओलॉजी विषयांमध्ये पीएचडी प्राप्त झाली आहे. पुणे येथील भारती विद्यापीठांमधून तीन वर्षाचा अभ्यासक्रम डीएम कार्डिओलॉजी हा पूर्ण करून त्यांना आता पीएचडी पदवी प्राप्त झाली आहे. त्यांनाही पदवी प्राप्त करत असताना डॉ. जगदीश हिरेमठ, डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी मार्गदर्शन केले आहे. रत्नागिरीतील पहिले कार्डिओलॉजिस्ट म्हणून डॉ. मतीन परकार यांनी मान मिळवला आहे. यामुळे हृदयावरील शस्त्रक्रिया दुर्बिणीतून होणे तसेच अन्य सुविधा उपलब्ध होणे रत्नागिरी वासी यांसाठी सहज शक्य होणार आहे. रत्नागिरीतील तमाम रुग्णांसाठी, नागरिकांसाठी 24 तास सेवा देण्यात येईल अशी माहिती डॉ. मतीन परकार यांनी दिली आहे. मतीन परकार यांना यापूर्वी युरोपियन सोसायटी ऑफ कार्डिओलॉजी येथून अर्ली डायग्नोसिस ऑफ हार्ट फेल्‍युअर या विषयातील संशोधनाबद्दल यंग रिसर्च अवॉर्ड पॅरिस याठिकाणी मिळाला आहे. मतीन परकार यांना पीएचडी प्राप्त झाल्याबद्दल रत्नागिरी वाचली यांमधून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. रत्नागिरीतील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नुकतेच त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button