जुनी पेन्शन व इतर मागण्यासाठी सर्व संगठना एकत्र,मागण्या मान्य नाही झाल्या तर ११ सप्टेंबर पासून बेमुदत संप

जुनी पेन्शन व ईतर मागण्यासाठी कर्मचारी संघटनांनी एकत्रीतरित्या एल्गार समन्वय समिती च्या नावाखाली काम करावयाचे व कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी एकत्रित लढण्याचे ठरले. जुनी पेन्शनसह कर्मचाऱ्यांच्या इतर सर्व विषयांसाठी यापुढे सर्व संघटना एकत्रितरित्या पुढे जाणार असून,
जुनी पेन्शन लागू झाल्याशिवाय इतर विषयांवर शासनाशी चर्चा ही करणार नसल्याचे समन्वय समितीने ठरविले आहे.अशी माहीती उमेश पाडवी, राज्य विश्वस्त महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटना यांनी दिली.
1. महाराष्ट्र राज्य ग्रेड मुख्याध्यापक महासंघ श्रीराम परबत
2. महाराष्ट्र वनरक्षक वनपाल संघटना शैलेंद्र भदाणे
3. शिक्षक सहकार संघटना शरद बरमे
4. शिक्षक हितकारणी संघटना प्रकाश पवार
5. महाराष्ट्र राज्य शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटना प्रकाश भिलारे
6. ओंकार प्रणित जि प कर्मचारी युनियन 4340 बलराज मगर
7. जि.प लिपिक वर्गीय 615 संघटना बापूसाहेब कुलकर्णी
8.महा.राज्य आयटीआय निदेशक संघटना राजेश खडबडे
9.महा.राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन सुभाष कराळे
10.प्राथमिक शिक्षक संघ अंबादास वांजे
11.प्राथमिक शिक्षक संघ समन्वय समिती निमंत्रक मधूकररावजी काठोळे
12.जि.प लिपिक वर्गीय संघटना विकास पापळ
13.महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक महासंघ अनंतराव हिंगणे
14.लिपिक हक्क परिषद व शिक्षकेत्तर संघटना उमाकांत सूर्यवंशी
15.माध्यमिक शिक्षकेत्तर संघटना शिवाजी खांडेकर
16.महा.राज्य प्राथमिक शिक्षक संघटना केशवराव जाधव
17.आरोग्य कर्मचारी संघटना अरुण खरमाटे
18.केंद्रप्रमुख संघटना अर्जुनरावजी साळवे
19.आरोग्य समन्वय समिती अशोक जयसिंगपुरे
20. प्राथमिक शिक्षक समिती आप्पा शिंपी
21.मनपा कर्मचारी महासंघ चारुशीला जोशी
22.पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती भागवत नेहरकर
23.प्राध्यापक कृती समिती सोमनाथ वाघमारे
24.शिक्षक भारती विनोद कडवं
यांसह 35 कर्मचारी संघटना दी.25.08.2019 ला पुणे इथे सभा पार पडली असून.समन्वय समिती मार्गदर्शक- बलराज मगर, बापूसाहेब कुलकर्णी, पालटकर, शिवाजीराव पाटील, संभाजी थोरात, अर्जुन साळवे, काळुजी बोरसे, अशोक बेलसरे.

एल्गार समन्वय समिती कोअर टीम-वितेश खांडेकर, अरुण खरमाटे, शिवाजी खांडेकर, मधुकर काठोळे, बाळकृष्ण तांबारे/आंबदास वांजे, केशवराव जाधव, उदय शिंदे, नवनाथ गेंड, शैलेंद्र भदाणे, विजयसिंह सूर्यवंशी, सुभाष कराळे, हरीश ससणकर, चारुशीला जोशी, उमाकांत सूर्यवंशी, विजय बोरसे, वाघमारे निवडण्यात आली.समन्वय समितीत नव्याने येणाऱ्या संघटना प्रतिनिधींना समन्वय समिती कोअर टीम मध्ये घेण्यात येणार. सर्व निर्णय कोअर टीम आणि समन्वय समिती सदस्य संघटनेला विश्वासात घेऊन घेण्यात येणार आहेत.

समन्वय समिती मध्ये तात्काळ ठरलेला कृती कार्यक्रम
28, 29 ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनामार्फत शासनाला नोटीस देणे.5 सप्टेंबर पासून प्रत्येक कर्मचऱ्याने आपल्या कार्यालयात काळ्या फिती लावून काम करणे.
9 सप्टेंबरला सर्व कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणीय संप करणे.
मागण्या मान्य न झाल्यास 11 सप्टेंबर पासून बेमुदत संप करणे.अशी माहिती उमेश पाडावे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button