
गणपती उत्सवासाठी आलेल्या महिलेला चोरट्यांचा हिसका, पावणेदोन लाखाचे दागिने लांबविले
मुंबई येथुन गणपती उत्सवासाठी आलेल्या एका महिलेला चोरट्यांनी चांगलाच हिसका दाखविला.या महिलेच्या पर्समधील असलेले पावणे दोन लाखांचे दागिने चोरटय़ांनी लांबविले.
साै. रतन बामणे या मुंबई येथे राहतात त्यांचे मुळगाव भाेम चिपळूण आहे.ते गणपती सणानिमित्त आपल्या दोन मुलांसह पतीसह मुंबईतून चिपळूण येथे आल्या. त्या भोम येथे जाण्यासाठी दोणवली बसमध्ये चढत असताना चोरट्यानी त्यांच्या खांद्याला लावलेल्या बॅगमध्ये ठेवलेली पर्स लांबविली. या पर्समध्ये साडेतीन तोळ्याचे मंगळसूत्र, चेन असे पावणे दोन लाखांचे दागिने होते. ते चोरट्यानी लांबविले. हा प्रकार लक्षात आल्यावर सदर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com