
नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार
महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावरील आरोप सिद्ध होण्याअगोदरच त्यांची बदनामी व मानसिक छळ केल्याप्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्यात आली आहे. याबाबतची माहिती भाजपचे शहराध्यक्ष अशिष खातू यांनी दिली.
महाविकास आघाडी व भाजप नगरसेवकांमध्ये गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या नगरसेवकांनी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे यांच्यावर मनमानी कारभाराचे आरोप करत त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली आहे. या अर्जावर आज (ता. 21) जिल्हाधिकारी यांच्यासमोर सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी भाजप नगरसेवक व चिपळूण शहराध्यक्ष आशिष खातू यांनी महाविकास आघाडी नगरसेवकांविरोधात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
www.konkantoday.com