राष्ट्रवादीच्यावतीने निषेध नाट्य ,मंत्री महोदय संतप्त
उन्हवरे येथे रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी झालेल्या निषेधामुळे ना.रामदास कदम व ना.रविंद्र वायकर चांगलेच संतप्त झाले. मात्र भूमिपूजन करून दोन्ही मंत्री निघून गेले.दापोली तालुक्यातील
उन्हवरे येथे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून बांधण्यात येणार्या उन्हवरे गोविंदशेत पांगारी रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमस्थळी आलेल्या मंत्र्यांच्या गाड्यांसमोर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक फडकावले. त्यामुळे येथील वातावरण काहीकाळ तणावपूर्ण झाले होते. निवडणुकीच्या तोंडावर एक वर्षापूर्वी सुरु झालेल्या विकासकामांचे पुन्हा भूमिपूजन करून जनतेची दिशाभूल करणार्या मंत्र्यांचा जाहीर निषेध हा मजकूर लिहिलेले फलक घेवून रस्त्याच्या बाजूला राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उभे होते. मंत्र्यांच्या गाड्या कार्यक्रमस्थळी आल्यावर या कार्यकर्त्यांनी आमदार संजय कदमांचा विजय असो, अशा घोषणाही दिल्या. या प्रकारामुळे भूमिपूजन कार्यक्रमाला आलेले कदम व पालकमंत्री रविंद्र वायकर हे संतप्त झाले त्यांनी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे काम पाहणार्या अभियंत्याला बोलावून घेतले व लोकांना त्या रस्त्याची आवश्यकता नसल्याने तसेच केवळ विरोधच करावयाचा असल्याने हे काम रद्द करण्यात यावे असे आदेश वायकर यांनी दिले असल्याचे कळते.
www.konkantoday.com