रत्नागिरी शहरवासीय होणार डासांपासून मुक्त
रत्नागिरी शहर सुंदर शहर असले तरी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर डासांची समस्या आहे. रत्नागिरी शहरात गटारे असली तरी या बंदिस्त गटारांमधून पावसाचे किंवा सांडपाणी जात नसल्याने शहरात मोठ्या प्रमाणावर डासांनी डोके वर काढले आहे.मोकळ्या जागी व घरात देखील डासांनी शिरकाव केल्याने नागरिक या त्रासाने हैराण झाले आहेत.शहराच्या स्वच्छतेची व आरोग्याची जबाबदारी नगर परिषदेची असल्याने रत्नागिरी शहर डासमुक्त करण्यासाठी डास निर्मूलनाची योजना नगर परिषदेमार्फत हाती घेण्यात आली असून त्यासाठी ५ फॉग मशीन खरेदी करण्यात आल्या आहेत. नगर परिषद हद्दीतील प्रत्येक प्रभागात ही मोहीम प्रभावीपणे राबवताना रत्नागिरीकरांनी त्या बाबतचे अभिप्रायही नगर परिषदेला कळवण्याचे आवाहन प्रभारी नगराध्यक्ष प्रदीप उर्फ बंड्या साळवी यांनी केले आहे.रत्नागिरी शहरात डास निर्मूलनाची मोहीम गेली काही वर्षे बंद होती.त्यामुळे डास निर्मूलनासाठी नगर परिषदेने प्रतिबंधात्मक उपाययोजना करावी, अशी मागणी जोर धरत होती.
www.konkantoday.com