
रत्नागिरीकरांना मिळणार घरबसल्या दूध
रत्नागिरीकरांनी एक रुपया डिलिव्हरी चार्ज दिल्यानंतर त्यांना घरपोच दूध मिळण्याची सुविधा आता उपलब्ध होत आहे.चिपळूणचे रहिवासी असलेले गेली अनेक वर्षे सौदी अरेबियात असलेले तरुण गुलजार वांगडे त्यांनी रत्नागिरीत स्टार्टअपच्या माध्यमातून हा व्यवसाय सुरू केला आहे. उत्पल नावाचे ब्रँडचे दूध छापण्यात आलेल्या किमतीत ग्राहकांना दिले जाणार आहे. ग्राहकांनी यासाठी काढलेल्या अॅपवर दुधाची नोंदणी करायची आहे. त्यानंतर त्यांच्या घरी दुधाचे वितरण होणार आहे. यासाठी एक रुपया डिलेव्हरी चार्ज घेतला जाणार आहे. सध्या रत्नागिरी शहरापुरते मर्यादित असलेला हा व्यवसाय लवकरच जिल्ह्यातही सुरू केला जाणार आहे.१ सप्टेंबरपासून म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत व नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांच्या उपस्थितीत हा उपक्रम सुरू होणार आहे.
www.konkantoday.com