भास्कर जाधव यांचा सेना प्रवेश जवळ जवळ निश्चित
दोन दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याचे कबूल केले होते.त्याचाच एक भाग म्हणून पक्षांतर पूर्वी भास्कर जाधव यांनी गुहागर विधानसभा मतदार संघाच्या प्रमुख पदाधिकार्यांची बैठक बोलावली होती.यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले कि मी भाजपमध्ये नाही परंतू दोन दिवसात पक्ष बदलणार आहे त्यामुळे त्यांचा शिवसेनेचा प्रवेश जवळजवळ निश्चित मानला जात आहे.यावेळी गुहागर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जाधव यांना पक्षांतर का करत आहात? आपल्यावर काय अन्याय झालाय? असे प्रश्नदेखील विचारल्याचे कळते परंतु भास्कर जाधव यांनी त्यावर कोणतेही उत्तर न देता जे आपल्या सोबत येतील त्यांना घेऊन पुढे जाऊ तसेच जे येणार नाहीत त्यांच्यावर मी नाराज नसेन असे सांगितले.शिवसेना भाजप युतीमध्ये विधानसभेची निवडणूक लढल्यास गुहागरची जागा ही भाजपाच्या वाट्याची जागा मानली जाते त्यामुळे भास्कर जाधव सेनेमध्ये आले तर ते कोणत्या मतदारसंघातुन निवडणूक लढवणार हा प्रश्नच आहे.
www.konkantoday.com