
बचत गटांना सक्षम करण्याऐवजी त्यांच्या तोंडचा घास काढून घेणारे सरकारमधील शुक्राचार्य
सरकारमधले शुक्राचार्य बचतगटांच्या तोडातील घास काढत असताना सरकार त्यांना पाठीशी घालत आहे.याबाबत हकीकत अशी गावातील शाळा, आंगणवाडी मधील मुलांना शासन काही खाद्य पदार्थ पुरविते मग ते शिजवून वाढण्याचे काम स्थानिक बचतगटांना दिल जात आणि गेली कित्येक वर्ष हे काम बचतगटच करत आले आहे.या साठी सरकारनेच प्रत्येक शाळेला जेवण शिजविण्याकरिता किचनशेड बांधुन दिली आहे. मग आता अस काय घडले म्हणून संपुर्ण महाराष्ट्रभर याची एकछ टेंडर काढायची अस पत्र शासनाने ग्रामपंचायतीला पाठविले आहे. याचा अर्थ बचतगटांना ही गावातील कामे देवून सक्षम करण्याएवजी असा कोणतरी शुक्राचार्य बसून हे सगळ करीत आहे आणि बचतगटाच्या तोंडातला घास हिसकावून घेत आहे. आज या पत्राबाबत नाचणेग्रामसभेत यावर चर्चा झाली असून ग्रामस्थांनी या प्रक्रियेला पुर्ण विरोध केला आहे. त्या त्या स्थानिक स्तरावर याबाबत निर्णय घेण्याबाबतचा ठराव शासनाकडे पाठवण्यात यावा असा ठराव करण्यात आला असुन यामागचे इंगित काय? मग शासनाने यापूर्वि हे काम बचतगटाला देणेबाबत निर्णय घेतला होता तो का बदलला? आणि किचनशेड का बांधली ? शेवटी टेंडर काढल्यानंतर मुंबई चा माणूस गावात जाऊन जेवण बनविणार का? तर तो कोणतरी स्थानिक माणूस बघणार आणि त्याला जेवण बनवायला लावणार आणि कमीशन आपण खाणार मग तेच पैसे गावातील काही महिलांना मिळाले तर सरकारच काय जातय नुसत बचतगटातील महिलांच सक्षमिकरण करायचा अशा फुशारक्या ग्रामविकासमंत्री पंकजाताई मुंढे मारणार का? त्यांनी या बाबतीत लक्ष घालून महिलांना न्याय द्यावा आणि या निर्णयाचा फेर विचार करावा .या बाबत आमदार उदय सामंत यांनी तसेच भाजपा जिलाध्यक्ष श्री. दिपक पटवर्धन यांनी लक्ष घालावे अशी बचत गटांची मागणी आहे.