पर्यटन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य जीएसटीमधून परतावा मिळणार

मुंबई :राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्य शासनाने पर्यटन धोरण आखले असून त्यानुसार पर्यटन प्रकल्पाना वित्तीय प्रोत्साहन देण्यात आली आहेत. या पर्यटन प्रकल्पांना वस्तू व सेवा कर प्रणालीतील राज्य जीएसटीच्या हिश्श्यातून परतावा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.पर्यटन हे आर्थिक विकासाचे एक प्रमुख साधन असून पर्यटन क्षमतेचा विकास केल्यास अर्थव्यवस्थेला बळकटी येऊ शकते. तसेच या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असल्याने शासनाने वर्ष १९९९, २००६ आणि २०१६ मध्ये पर्यटन धोरणे जाहीर केली आहेत. या धोरणांमध्ये पर्यटन प्रकल्पांना विविध वित्तीय व इतर सवलती देण्यात आलेल्या आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button