
साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी आणखी दोन आठवड्यांची मुदत
साईसंस्थान विश्वस्त मंडळ नियुक्तीसाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडे आज पुन्हा दोन आठवड्यांची मुदत मागवून घेतली. पूर्वानुभव लक्षात घेता, निवडीच्या निकषांच्या कचाट्यात सापडून नवे मंडळ बरखास्त होऊ नये, यासाठी पावले उचलण्यास सुरवात झाली आहे. सरकारी पातळीवरून ताक फुंकून पिण्याचे धोरण स्वीकारण्यात आले आहे. तसे संकेत जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनीदेखील दिले.
www.konkantoday.com