निवृत्तीचा निर्णय मागे घ्या, रत्नागिरी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांची डॉ. तानाजीराव चोरगे यांचेकडे मागणी
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी बँकेच्या कारभारातून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता . बँकेच्या कारभारातून निवृत्त होऊ नये, यासाठी बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी डॉ. चोरगे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला असून, त्यांनी निर्णय मागे घ्यावा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे.बँकेला वेगळ्या टप्प्यावर नेणारे अध्यक्ष डॉ. चोरगे यांनी बँकेच्या कारभारातून निवृत्त होऊ नये, अशी सर्वसाधारण भावना बँकेच्या प्रत्येक कर्मचारी व अधिकाऱ्याची आहे. त्यामुळे बँकेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्यावतीने डॉ. चोरगे यांना एक निवेदन दिले. डॉ. चोरगे यांनी बँकेची निवडणूक न लढवण्याचा आणि बँकेच्या कारभारातून निवृत्ती घेण्याचा निर्णय मागे घ्यावा, अशा मागणीचे निवेदन सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आले आहे.
www.konkantoday.com