
चिपळुणातील पूरग्रस्त भागाचे पाहणीसाठी केंद्रीय समिती आता दौर्यावर
चिपळुणातील पूर ओसरून अनेक दिवस गेल्यानंतर चिपळूण येथील पूरग्रस्त परिस्थिती व त्या आधी झालेल्या तिवरे धरण फुटीच्या पाहणीसाठी केंद्रीय कमिटी आता चिपळूण दौर्यावर आली आहे. या कमिटीने खडपोली खेर्डी कळबस्ते विभागाची पाहणी केली त्यानंतर हे पथक तिवरे कडे रवाना झाले. वीस गाड्यांमधून हे पथक या भागात फिरत आहे.त्यांचे बरोबर जिल्ह्यातील प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी देखील आहेत ही समिती केंद्राला नुकसानीचा अहवाल सादर करेल त्यानंतर केंद्राकडून मदत दिली जाणार आहे.
www.konkantoday.com