राजीवडा येथे दोन गटात हाणामारी,परस्परविरोधी तक्रारी

रत्नागिरी :-रत्नागिरी नजीक राजिवडा येथे दोन गटात हाणामारी झाली.यातील दोन गटांनी परस्पर विरोधी तक्रार दाखल केले आहेत.यावरुन एकूण १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार नाजीर हसनमियाँ वस्ता.वय-३६, रा. राजिवडा नाका हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास घरातील कचरा टाकण्यासाठी जेटीवर जात असताना जेटीवर पडलेले मासे ताहीर मुल्ला याने नाजीर यांच्या अंगावर फेकले. यावेळी नाजीर यांनी मासे अंगावर का फेकलेस असा जाब ताहीर याला विचारला. जाब विचारल्याचा राग मनात धरून ताहीर मुल्ला, इम्रान मुल्ला, रफिक मुल्ला आणि अन्य ४ ते ५ जणांनी नाजीर वस्ता यांच्या घरात घुसून त्याना मारहाण केली. काठ्या आणि लाकडी बॅटने नाजीर व त्यांच्या पत्नीला मारहाण करण्यात आली. यावेळी नाजीर यांचे मेहुणा रियाज महंमदहुसेन मिरकर हे वाद सोडविण्यासाठी पुढे आले असता त्यानाही मारहाण करून त्यांच्या डोक्यात बॅट मारली. त्यामध्ये रियाज गंभीर जखमी झाले. ही मारहाण सुरू असतानाच रियाज यांच्या खिशातील पाकीट व ४७ हजार रुपयांची रोकड आणि बँकांची एटीएम कार्ड, दोन मोबाईल हिसकावून घेतले गेले . या प्रकरणी नाजीर वस्ता यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी ताहीर मुल्ला, इम्रान मुल्ला, रफिक मुल्ला आणि अन्य ४ ते ५ जणांविरोधात भा. दं. वि. कलम ३९७, १४३, १४७, १४८, १४९, ४२२, ३२४, ३२६, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी ताहीर लतीफ मुल्ला यांनी दिलेल्या तक्रारीनुसार रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास ताहीर हे राजिवडा जेटीवरून जात असताना रियाज महंमदहुसेन मिरकर, नाजीर वस्ता व त्यांची पत्नी फौजिया वस्ता आणि अन्य ४ जणांनी संगनमत करून ताहीर याला रस्त्यात अडवले. ‘तुला व्यवहारासाठी बोलवले होते ,तू का आला नाहीस’ असा जाब विचारून ताहीर याला मारहाण केली. या मारहाणीत ताहीर यांच्या गळ्यातील सोन्याची चैन गहाळ झाली. या प्रकरणी ताहीर यांनी शहर पोलीस स्थानकात तक्रार दिली.या तक्रारीवरून पोलिसांनी रियाज महंमदहुसेन मिरकर,नाजीर वस्ता व त्यांची पत्नी फौजिया वस्ता आणि अन्य ४ जणांविरोधात भा. दं. वि. कलम १४३, १४७, १४८, ३२३, ४२७, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button