महसूल कर्मचार्यांच्या मागण्या मान्य, पण अंमलबजावणीचा अभाव
रत्नागिरी:शासनाकडून तत्वतः मान्यता मान्य होवूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ महसूल कर्मचार्यांनी सामूहिक रजा टाकून आंदोलन केले. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुतेक कर्मचारी सहभागी होते. राज्यातील पुर परिस्थितीमुळे आयोलनाच्या तारखांमध्ये थोडा बदल केला होता.
शासनासोबत झालेल्या बैठकांमध्ये शासनाने महसूल कर्मचार्यांच्या अनेक मागण्यांना तत्वतः मान्यता दिली होती. सहा वर्ष होवूनही शासनाने त्यावर अद्याप कोणताही निर्णय निर्गमित केलेला नाही. म्हणून नाईलाजास्तव महसूल कर्मचार्यांनी गेल्या ११ जुलैपासून टप्प्याटप्प्याने आंदोलनास सुरूवात केली. यापूर्वीचे चार टप्प्यातील आंदोलन यशस्वी झाले. त्यानंतर १६ ऑगस्टला राज्यभर महसूल कर्मचारी संगणक व लेखणी बंद आंदोलन केले. मात्र सद्य स्थितीतील राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे उदभवलेल्या परिस्थितीत जनतेचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे व मदत वाटप करण्याचे महत्वाचे काम महसूल विभागातील कर्मचारी रात्रंदिवस करीत आहेत. शासनाकडून महसूल कर्मचार्यांवर नेहमीच अन्याय होत असला तरी जनता व शासनाच्या सेवेत महसूल कर्मचारी सदैव तत्पर असतो. राज्य महसूल कर्मचारी संघटनेने १६ ऑगस्टला पुकारलेले संगणक व लेखणी बंद आंदोलन रद्द केले होते. सदर दिवशी राज्यातील सर्व महसूल कर्मचार्यांनी नियमित कामकाज केले.
www.konkantoday.com