
दापोली विवाहितेच्या आत्महत्या प्रकरणी तीन जणांना अटक
दाभोळ: तालुक्यातील निगडे येथील श्वेता सुभाष रेवाळेच्या आत्महत्याप्रकरणी दापोली पोलिसांनी तीन संशयित महिलांना अटक केली. न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
निगडे येथील श्वेता सुबाष रेवाळे (४०) या विवाहितेने २९ जुलैला गावातील एका सार्वजनिक विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती. या विवाहितेचा पती सुभाष देवळे याने आपल्या पत्नीला आत्महत्या करण्यास भाग पाडण्यात आल्याची तक्रार दापोली पोलीस ठाण्यात दिली होती. मयत श्वेता हिने आत्महत्या करण्यापूर्वी घरात एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. चिठ्ठीत तीन महिलांची नावे लिहून ठेवली होती. या तक्रारीवरून या तीन संशयित महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
www.konkantoday.com