जिल्हा रूग्णालयाच्या कारभारामुळे सामान्य रूग्णांची परवड
रत्नागिरी-रत्नागिरी जिल्हा शासकीय रूग्णालय हे सर्वसामान्य रूग्णांना आधार असणारे केंद्र असून ते मात्र सध्या या रूग्णालयाच्या कारभारामुळे सामान्य रूग्णांची परवड होत असून त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत सोशल मिडियावर रूग्णालयाच्या कारभाराबाबत टीका होवूनही लोकप्रतिनिधी व प्रशासन याकडून कोणतेही लक्ष दिले जात नाही. जिल्हा रूग्णालयाच्या प्रशासकीय कारभाराबाबत लोकांच्यात प्रचंड नाराजी असून शासकीय कर्मचार्यांची वैद्यकीय बिले जिल्हा रूग्णालयाच्या माध्यमातूनच मंजूर होत असतात. मात्र या बिलांवर वजन पडल्याशिवाय स्वाक्षर्या होत नसल्याची टीका होत आहे.
अनेकांना आवश्यक असलेले वैद्यकीय दाखले मुद्दाम पाडून ठेवण्यात येत असून रूग्णांच्या मते रूग्णालयाच्या ठराविक एजंटांमार्फतच गेल्यास हे दाखले मिळू शकतात असा रूग्णांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. एकूणच जिल्हा रूग्णालयाच्या कारभाराबाबत लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
www.konkantoday.com