
गुहागरचा आमदार भाजपचाच असेल- आ. लाड
गुहागर: पुढील पन्नास दिवस कार्यकर्त्यांनी झोकून देवून काम केल्यास पुढचा आमदार आपलाच असेल असे सांगत डॉ. विनय नातू यांची उमेदवारी निश्चित असल्याचे भाजप प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी जाहीर केले. शृंगारतळी येथील बुथ कार्यकर्ता मेळाव्यामध्ये ते बोलत होते. महाराष्ट्रात युती तर होणारच आहे. युती नाहीच झाली तर कोकणात आठही विधानसभा लढवण्याची ताकद आपल्याकडे आहे. मागच्यावेळी गणिते चुकली, यावेळी चूक होवू देणार नाही. पुढच्या पन्नास दिवसात कुठल्या भाईची साथ घ्यायची, दादांच्या पाठिवर हाथ ठेवायचे ते आपण ठरवले पाहिजे. दररोज चार तास पक्षाचे काम करा, असे आवाहनही त्यांनी केले.
www.konkantoday.com