कोकणात व्यवसायाच्या मोठ्या संधी,पण कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष-आशिष शेलार

मुंबई: कोकणात व्यवसायाच्या मोठ्या संधी आहेत. मात्र कोकणाकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याची कबुली देत शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी सरकारला घरचा आहेर दिला. समृद्ध कोकण संघटनेकडून आयोजित ऍडव्हान्टेज कोकण परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते.
कोकणी माणूस वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न करतोय. मात्र त्याला सरकारकडून आवश्यक ती मदत मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. कोकणात आंबा, काजू, समुद्र आणि वन्यप्राण्यांच्या अनेक समस्या आहेत. या समस्यांचे संधीत रूपांतर करा, तुमची स्वप्न नक्कीच पूर्ण होतील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.
ऍडव्हान्टेज कोकण परिषदेच्या निमित्ताने अनेक मान्यवरांचा गौरवदेखील करण्यात आला. पितांबर उद्योगसमुहाचे अध्यक्ष रविंद्र प्रभूदेसाई, शर्लीन मोंटाचे अध्यक्ष अविनाश पाटील आणि दत्त नर यांना कोकण आयडॉल पुरस्काराने गौरविण्यात आले. गारवा कृषी पर्यटन केंद्राचे संचालक सचिन कोचरेकर, श्रीपात मोरूडकर, दिगंत फाऊंडेशनचे अध्यक्ष राहुल तिवरेकर, कडवई ग्रामस्थ मंडळाचे विनायक झोरे यांना कोकण गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले. कोकणच्या विकासासाठी सरकारने १ हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पातून करावी अशी मागणी समृद्ध कोकण संघटनेचे अध्यक्ष संजय यादव यांनी केली.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button