
आ.भास्कर जाधव यांची उद्धव ठाकरे यांच्याशी भेट झाल्याची कबुली
गुहागरचे आ.भास्कर जाधव व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट झाल्याची चर्चा चार दिवस सुरू होती. अखेर या बाबत आ.जाधव यांनी स्वतः खुलासा करित होय आपली भेट झाली. आणि आपल्याला शिवसेना प्रवेशाचे आमंत्रण उद्धव ठाकरे यांनी दिल्याचे पत्रकार परिषदेत जाहीर केले .आता याबाबत कुटुंब आणि कार्यकर्त्याशी बोलून निर्णय घेऊ असेही सांगितले त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंप होण्याचे संकेत मिळाले आहेत.
बुधवारी सकाळी 11वाजता आ.जाधव यांनी पत्रकार परिषद घेतली.यावेळी पुत्र समीर ,विक्रांत जाधव व कार्यकर्ते उपस्थित होते.आ.जाधव म्हणाले ,उद्धव ठाकरे व आपली 15 वर्षानंतर भेट झाली.त्या आधी पवारसाहेबांनो मंत्री केल्यावर स्वा.शिवसेना प्रमुख यांनी फोन करून अभिनंदन केले होते व मोठा हो असा आशीर्वाद दिला होता.मात्र त्यांच्या नंतर प्राथमच उद्धव ठाकरे यांची भेट झाली.त्यावेळी 2004 च्या निवडणुकीच्या वेळी पक्षाकडून अन्याय झाल्याचे स्पष्ट करून त्याची कारणे काय? कशामुळे अन्याय झाला त्याला कोण जबाबदार होते.या विषयी असलेले मळभ या भेटीत दूर झाले.त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सेना प्रवेशाचे आमंत्रण दिल्याचे सांगितले.
आता याविषयी कुटूंब आणि जवळच्या कार्यकर्त्यांशी बोलून ठरवू असें सांगितले.
यामुळे त्यांचा सेना प्रवेश पक्का मानण्यात येत आहे.
www.konkantoday.com