
रत्नागिरी शहरातील सायली दामले यांचे मरणोत्तर देहदान
रत्नागिरी शहरातील नरहर वसाहत (अभ्युदयनगर) येथील रहिवासी सौ. सायली सतीश दामले (५५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या इच्छेनुसार कुटुंबियांनी त्यांचे देहदान केले. बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाल्यानंतर डेरवण येथील वालावलकर रूग्णालयास मृतदेह सुपूर्द करण्यात आला. सायली दामले या मनमिळावू व नेहमीच इतरांना मदत करणार्या आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्यांच्या पश्चात पती, मुलगी असा परिवार आहे.
www.konkantoday.com