
मिरकरवाडा बंदरातील कामाला प्रशासकीय मान्यता
रत्नागिरी: मिरकरवाडा मच्छिमार बंदराच्या पायाभूत सुविधांच्या कामांना आता शासनाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. चक्रीवादळ व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे मिरकरवाडा बंदराची हानी झाली होती. यासाठी ९५ कोटींचा आराखडा बनवण्यात आला होता. या प्रस्तावाला आता प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
www.konkantoday.com