पोलीस असल्याचे सांगून आणखी एका वृद्धाला फसवण्याचा प्रकार
पोलिस असल्याची बतावणी करून रत्नागिरीतील एका वृद्धाला फसवण्याचा प्रकार झाला असतानाच आता संगमेश्वर येथेही अशाच प्रकारे एका वृद्धाला फसवून त्याच्या अंगावरील सोन्याची चेन पळवून नेण्याची घटना घडली आहे.यातील फिर्यादी अनंत गवळी राहणार मुळे स्टॉप संगमेश्वर हे संगमेश्वर एसटी स्टॅंड ते मुळे बसस्टॉप असे चालत जात असताना रस्त्यावरून आलेल्या एका दुचाकीस्वारांनी त्यांना थांबवले व आपण पोलिस असल्याची बतावणी करून तपासणी करण्याच्या बहाण्याने त्यांच्या गळ्यातील ७६ हजार रुपये किमतीची सोन्याची चेन घेऊन ते पळून गेले.
www.konkantoday.com