नाणार रिफायनरी प्रश्नावरून समर्थक व विरोधक सरसावले
गणपती उत्सवाच्या निमित्ताने अनेक चाकरमानी कोकणात येत असून आता नाणार रिफायनरी प्रकल्पावरून समर्थक व विरोधक एकमेकांसमोर ठाकले आहेत.नाणार प्रकल्पाला विरोध करणाऱ्या संघर्ष समितीच्या वतीने नाणार चा रणसंग्राम या पुस्तकाच्या मुखपृष्ठांचा प्रकाशन संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांच्या हस्ते पार पडले. त्यामुळे नाणार विरोधक परत एकदा जागृत झाले असतानाच या प्रकल्पाचे समर्थन करणारे समर्थक देखील आता पुढे आले आहेत.प्रकल्प समर्थकांनी विले डोंगरतिठा येथे रिफायनरी समर्थक संघटनेच्या जनसंपर्क कार्यालय सुरू करून लोकांच्या या प्रकल्पाच्या बाजूने जागृती करण्याचे काम सुरू केले आहे. या प्रकल्पाचे समर्थन करणार्या कोकण जन कल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंढरीनाथ आंबेरकर व सचिव अविनाश महाजन यांनी प्रकल्पाची चांगली बाजू लोकांच्या समोर मांडून या प्रकल्पाला समर्थन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. कोकणातल्या मंडळीचे निर्णय बरेचदा मुंबईकरांवर अवलंबून असतात आणि गणपती उत्सवाच्या निमित्ताने मुंबईकर कोकणात येणार असल्याने नाणार रिफायनरी प्रकल्प विरोधक व समर्थक सरसावले आहेत.
www.konkantoday.com