गणेशगुळे परिसरातील बिबट्याला पकडण्यासाठी वनखात्याने आर आर टी टीम बोलावली
पावस गणेशगुळे भागात ग्रामस्थांवर हल्ला केलेला बिबट्या वनखात्याच्या पिंजऱयात मिळत नसून त्याच्या बंदोबस्तासाठी आता वनविभागाने आणखी पावले उचलली आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी आता वनविभागाने रॅपिड रिस्पॉन्स टीम बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने पिंजरे व कॅमेरे बसवले आहेत. मात्र त्यात हा बिबट्या मिळत नसल्याने वन विभागाने या टीमला बोलावले आहे.ही टीम घटनास्थळी भेट देऊन बिबटय़ाला पकडण्यासाठी आणखी काही उपाययोजना करण्यात येतील का? याची माहिती घेणार आहे.त्यानंतर नवीन उपाय योजना करण्यात येणार आहे.
www.konkantoday.com