ऑनलाईन गंडा घालणार्‍या आरोपींनी लॉज मालकाचेही बिल थकविले

रत्नागिरी:रत्नागिरी येथील समर्थ डिजिटल या दुकानातून २ टीव्ही खरेदी करून ऑनलाईनद्वारे पेमेंट करतो असे सांगून दुकानमालकाला ९६ हजार रुपयांना गंडा घालणारे आरोपी अमित माखिजा, सुमित मखिजा रा. कोल्हापूर तर गजानन माने रा. सांगली या तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु या आरोपींनी रत्नागिरीतील मारूती मंदिर येथील लॉज मालकालाही खोलीचे व खाण्याचे पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याची तक्रारही त्यांच्याविरूद्ध दाखल झाली आहे. या तिघा आरोपींनी दोन दिवसांसाठी मारूती मंदिर येथील एका लॉजवर रूम घेतली. त्यांनी सुरूवातीचे ऍडव्हान्स म्हणून रक्कम भरली. त्यानंतर जवळ असलेल्या बारमधून दारू व स्नॅकची ऑर्डर केली. त्याचे झालेले ३५०० रुपयांचे बिल लॉजच्या बिलाबरोबर देतो असे सांगितले. मात्र त्यानंतर लॉजचे उर्वरित भाडे व बारचे बिल असे मिळून ५६४१ रुपयांचे बिल न देताच आरोपी फरारी झाले होते. याबाबत लॉजच्या मॅनेजरनी पोलिसांमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button