
ऑनलाइन फसवणूक करणारे तिघे जण पोलिसांच्या ताब्यात
रत्नागिरी येथील समर्थ डिजिटल या दुकानातून दोन स्मार्ट टीव्ही खरेदी करून दुकानाच्या मालकांच्या बँक खात्यावर पैसे क्रेडिट झाल्याचे खोटे दाखवून प्रत्यक्षात फसवणूक करून दुकानदाराला ८२हजार रुपयांचा गंडा करणाऱ्या तीन जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे.अटक केलेल्या आरोपींची नावे अमित मखिजा, सुमीत मखिजा राहणार कोल्हापूर ,गजानन माने राहणार सांगली अशी आहेत आरोपींना चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या टोळीने आणखीही असे प्रकार केले असण्याची शक्यता आहे.
www.konkantoday.com