
मोबाइल चोरीप्रकरणी दोन जण अटकेत
चिपळूण येथे रेल्वे स्थानकात मोबाईल चोरी प्रकरणी मुझफ्फर कुरेशी व अतिक शेख या दोन जणांना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.हे दोघेही श्रीरामपूर येथील राहणारे आहेत.या मोबाईल चोरी प्रकरणात पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर ट्रेकिंगद्वारे हा मोबाइल श्रीरामपूर येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.यामुळे पोलिसांनी तेथे जाऊन या दोन संशयितांना अटक केली आहे.
www.konkantoday.com