
ब्रेक टेस्टिंग प्रकरणी आंदोलनावर चिपळूणमधील रिक्षाचालक मालक ठाम
येत्या सोमवारपासून चिपळूण पिंपळी येथे ब्रेक टेस्टिंग ट्रॅकवर जिल्हा परिवहन विभागाचा कॅम्प होणार असल्याचे परिवहन खात्याकडून जाहीर करण्यात आले असले तरी आमचा त्यांच्यावर विश्वास नाही जोपर्यंत प्रत्यक्ष ट्रॅकवर कॅम्प होणार नाही तोपर्यंत रिक्षा चालक मालक संघर्ष समिती आपल्या आंदोलनावर ठाम आहे.या ठिकाणी जो पर्यंत कॅम्प सुरू होत नाही तोपर्यंत उत्तर रत्नागिरीतील एकाही शासकीय विश्रामगृहावर कॅम्प होऊ देणार नाही असा इशारा वाहतूक संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष राजू खेतले यांनी दिला आहे. येत्या सोमवारी सर्व वाहनचालक सकाळी शासकीय विश्रामगृहावर धडकणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com