दापोली विधानसभा निवडणूकीत कुणबी समाजाचा उमेदवार लढणार
दापोली विधानसभा मतदारसंघातून कुणबी समाजाचा उमेदवार उभा करण्याचा निर्णय झाला असल्याची माहिती स्वाभिमान बहुजन संघटनेचे अध्यक्ष गजानन पडियार व कुणबी समाजोन्नती संघ शाळेचे दापोलीचे अध्यक्ष रमेश पागंत यांनी दिली आहे.या मतदारसंघातून उमेदवारी लढवण्याचे निश्चित झाले असले तरी इच्छुक उमेदवारां बरोबर चर्चा करून उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात येईल त्यानंतरच पुढील रणनीती जाहीर केली जाणार आहे.
www.konkantoday.com