म्हाडा प्राधिकरणाच्या बैठकीसाठी म्हाडाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे पथक रत्नागिरीत दाखल
रत्नागिरीचे आमदार व म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांच्या प्रयत्नामुळे व आग्रहामुळे म्हाडा प्राधिकरणाची बैठक प्रथमच मुख्यालयाच्या बाहेर रत्नागिरीत होत आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या या बैठकीसाठी म्हाडाचे प्रमुख अधिकारी राज्य पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी असे पन्नास उच्चस्तरीय अधिकाऱ्यांचे पथक बैठकीसाठी दाखल झाले आहे. म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत असून या बैठकीत कोकणात होणाऱ्या म्हाडाच्या प्रकल्पाबाबत महत्त्वपूर्ण निर्णय होणार आहेत. म्हाडाच्या मार्फत पोलिसांच्या गृहप्रकल्पाचा ही विचार केला जाणार आहे त्या बैठकीमुळे कोकणातील म्हाडाचे प्रकल्प मार्गी लागणार आहेत.
www.konkantoday.com