पोलीस असल्याचे भासवून वृद्धाची चेन व अंगठी चोरली
शिवाजीनगर भागात रस्त्यावरून फिरणाऱ्या वृद्धाला पोलीस असल्याचे सांगून त्यांच्याकडील सोन्याची चैन व अंगठी काढून घेऊन त्याची अठ्ठावीस हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडला आहे. शिवाजीनगर भागात राहणारे मोतीराम पांडे हे वृद्ध दुपारी शिवाजीनगर परिसरात पायी फिरत होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या इसमाने त्यांना थांबवले आपण पोलीस असल्याचे सांगून त्यानी मोतीराम यांचे चेकिंग करण्याचे नाटक केले मोतीराम यांचेकडून सोन्याची चैन अंगठी पाकीट व मोबाइल काढून घेऊन एका रुमालात बांधून ठेवला चेकिंग पूर्ण झाल्याचे सांगून त्यांनी हा रुमाल मोतीराम यांना परत केला मोतीराम यांनी पाकीट व मोबाइल दिसल्यावर आपला सर्व माल रुमालात आहे असा समज करून घेतला परंतु ते घरी गेल्यानंतर तपासले असता त्यातील सोन्याची अंगठी व चैन गायब असल्याचे दिसून आले आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
www.konkantoday.com