खासगी आरक्षण केंद्रासाठी एसटीची टॉप अप सेवा उद्यापासून सुरू

एसटी परिवहन महामंडळाने आता आपल्या कारभारात देखील अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून त्याने खासगी आरक्षण केंद्रांची निर्मिती करून तेथून एसटीचे तिकीट विक्री करता येऊ शकत होती.या आरक्षण केंद्र चालकांना प्रत्येक वेळी डेपोत जाऊन पैसे भरावे लागत होते. केंद्र चालकांसाठी एसटीने उद्यापासून टॉप अप सुविधा उपलब्ध करून दिली आहे.या सुविधेमुळे आरक्षण केंद्र धारकाला ऑनलाइन पैसे भरता येणार आहेत यासाठी स्वतंत्र खाते उघडूनएसटीने तयार केलेल्या वॉलेटमध्ये सुरुवातीला पंचवीस हजार रुपयाचा टॉपअप मारावा लागणार आहे त्यानंतर दहा हजार रुपयांच्या पटीत टॉपअप करता येईल या सुविधेसाठी प्रत्येक एजंटला युजर आयडी व पासवर्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button