*संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाच्या इमारतीची अवस्था बिघडली
मुंबई गोवा महामार्गावरील महत्त्वाचे स्थान असलेल्या संगमेश्वर येथील ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य व्यवस्थाच मोडकळीला आली आहे. या ग्रामीण रुग्णालयाची इमारतही पूर्णपणे मोडकळीला आली आहे.रुग्णालयातील पंखे नादुरुस्त झाले असून रुग्णालयाच्या दुरावस्थेचा परिणाम रुग्णांवर होत आहेत. इमारतींच्या खिडक्या मोडकळीला आल्या असून इमारतीलाही काही ठिकाणी तडे गेले आहेत इमारतीचा परिसरही अस्वच्छ असून त्यातूनच रुग्णांना ये जा करावी लागत आहे. सभागृहाकडे जाणार्या रस्त्यावर मोठी झुडपे उगवली आहेत एकुणच रुग्णालयाची अवस्था बिघडल्याचे चित्र समोर येत आहे.
www.konkantoday.com