मनोरूग्णालयातील स्वच्छता काम करणार्‍या संस्थेला कामाचे पैसे नाहीत

रत्नागिरी:रत्नागिरी येथील प्रादेशिक रूग्णालयात रूग्णांचे कपडे व बेडशीट धुवून स्वच्छ करण्यासाठी एका संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. त्याप्रमाणे संस्थेशी करारही झाला होता. मात्र करार केलेल्या संस्थेला गेले १३ महिने कामाचे पैसेच मिळाले नसल्याचे प्रकार उघडकीला आला आहे. तरी देखील सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून या संस्थेने हे काम सुरू ठेवले होते. मात्र अजूनही पैसे मिळत नसल्याने त्यांनी गेल्या ४ दिवसांपासून हे काम थांबविले आहे. त्यामुळे मनोरूग्णालयात भरती असलेल्या रूग्णांच्या स्वच्छतेबाबत प्रश्‍न निर्माण झाला आहे. याबाबतीत तात्पुरत्या स्वरूपात रूग्णालयात धुलाई मशिन बसवून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात असला तरी हा प्रयत्न अपुरा आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button