
भारतीय जनता पक्षाची अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली काही मंडळी कोकणात फिरत आहेत– खासदार विनायक राऊत
भारतीय जनता पक्षाचे अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेली काही मंडळी कोकणात फिरत असल्याची टीका खासदार विनायक राऊत यांनी केली आहे ही मंडळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणी जनतेच्या भावनांशी खेळ करण्याचे काम करीत आहेत मागील सरकारला जे जमले नाही ते महाविकास आघाडीच्या सरकारने करून दाखवले असेही राऊत यांनी सांगितल.निसर्ग चक्रीवादळात कोकणचे मोठी हानी झाली तरीदेखील सरकारने नारळाला दोनशे पन्नास आणि सुपारीला पन्नास रुपयात नुकसानभरपाई दिली हे तुटपुंजी असल्याचा आरोप भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी करून त्यांनी सरकारचा निषेध केला होता व मुख्यमंत्र्याला भेट म्हणून सुपारी व नारळाच्या झाडाचे रोप जिल्हाधिकारी यांच्याकडे दिली होती
लाड यांच्या कृतीचा राऊत यांनी समाचार घेतला अशी रोपे देणाऱ्या भाजपच्या नेत्यांची आपल्याला किंवा वाटते असे त्यांनी सांगितले या लोकांना कोकणी जनतेच्या आरोग्याचे काही देणेघेणे नाही कोकणी जनता आणि शिवसेना यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम हे नेते करीत असल्याचा आरोपही राऊत यांनी केला
www.konkantoday.com