चिपळूणमधील चौपदरीकरणात आणखी गोंधळ ,मार्किंगमध्ये फरक
चिपळूण येथे मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम हटवण्याचे काम सुरू असतानाच महामार्ग विभागाकडून पूर्वी केलेल्या आणि आता केलेल्या मार्किंग मध्ये फरक आढळल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. महामार्ग विभागाने २०१५ साली याच विभागात केलेल्या मार्किंग मध्ये व आता केलेल्या मार्किंग मध्ये काही ठिकाणी एक मीटर किंवा त्यापेक्षा अधिक अंतराचा फरक पडला आहे.हे मार्किंग वाढल्यामुळे याचा फटका अनेक बांधकामांना बसणार असून यामुळे नागरिकांच्या गोंधळ उडाला आहे. या वाढीव मार्किंगचे नुकसान भरपाई कोण देणार असा नागरिकांचा सवाल आहे.आता मार्किंगमध्ये हा फरक पडल्यामुळे आधी भूमी अभिलेख खात्याकडून पुन्हा एकदा मार्किंग करून घ्या आणि त्यानुसार बांधकामे तोडा अशी मागणी स्थानिकांनी करून या ठिकाणी चौपदरीकरणाचे काम घेतलेल्या चेतक कंपनीच्या अधिकाऱयांना परत पाठवले.
www.konkantoday.com