
खराब हवामानामुळे दाभोळ बंदरातील आलेल्या बोटी येत्या काही दिवसात परतणार
दापोली: दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीपट्टीत वादळीवारे व प्रतिकुल हवामानामुळे आश्रय घेतलेल्या चीनच्या बोटी येत्या काही दिवसातच परत जाणार आहेत. चीनमधील ओशियन स्पार्कल फिशींग कंपनीच्या या बोटी खराब हवामानामुळे दाभोळ बंदरात आल्या होत्या. त्या बोटींवर चीन, फिलीपाईन्स व इंडोनेशियन देशाचे १३१ खलाशी काम करीत होते. ते सध्या या बोटीवरच आहेत. मध्यंतरी या बोटीतील कर्मचार्यांची आपापसात मारामारी देखील झाली होती. भाषेतील अडसरामुळे या लोकांशी संवाद साधणेही कठीण होते. गेले अडीच महिने या बोटी बंदरात उभ्या आहेत परंतु आता या बोटी येथून परत जाणार आहेत.
www.konkantoday.com