कोकणात नारळ उद्योगातून मोठा रोजगार उपलब्ध होऊ शकताे-संतोषकुमार
नारळ खात्याच्या माध्यमातून शेतीवर व निसर्गाचा वापर करून मोठ्या उद्योगांपेक्षा लघू व मध्यम उद्योग उभारून रोजगार निर्मिती करता येऊ शकेल असे प्रतिपादन महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार यांनी रत्नागिरी येथे व्यक्त केले. रत्नागिरी येथे महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळामार्फत काथ्या२०१८ च्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना संतोष कुमार म्हणाले कोकणला मोठा सागर किनारा लाभला आहे. या ठिकाणी पर्यावरणस्नेही प्रकल्प नाहीत तसे प्रकल्प या ठिकाणी उभे राहणे आवश्यक आहे नारळापासून होणाऱ्या उद्योगांना चालना दिली पाहिजे नारळापासून निघणाऱ्या काथ्यापासून दोरी, पायपुसणे इत्यादी उत्पादने घरबसल्या महिला करू शकतात. या कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नारळ लागवडीचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून नारळाच्या सोडण्यापासून काथ्या व खात्यावर आधारित मोठ्या प्रमाणावर लघु व मध्यम उद्योग निर्माण होऊ शकतील त्यातून रोजगार उपलब्ध होऊ शकेल असे सांगितले.
www.konkantoday.com