पावस गणेशगुळे परिसरात मोटारसायकलवरून जाणाऱ्यांवर बिबट्याचा हल्ला ,सहा जण जखमी
पावस गणेशगुळे परिसरात काल मोटारसायकलवरुन जाणार्या गावकऱ्यांवर बिबट्याने परत हल्ला केल्याने खळबळ उडाली आहे. यामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिसरात फिरणार्या बिबट्याने यापूर्वीही अनेक जणांवर हल्ले केले आहेत. वनखात्याने उपाययोजना करूनही हे बिबटे जाळ्यात येत नसल्याने नागरिकांच्या घबराट निर्माण झाली आहे. या परिसरात एकापेक्षा जास्त बिबटे फिरत असावेत असा अंदाज आहे.गणेशगुळे गावातील चार मोटारसायकलवर बसून सहाजण आपल्या घरी निघाली असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्या मध्ये निखिल साळवी,नीलेश महादे, संदीप शिंदे ,मंजुनाथ आधीन ,नीलेश नाटेकरहे गंभीर जखमी झाले आहेत. यातील पहिल्या काही मोटारसायकलवर बिबट्याने हल्ला केला ते जखमी झाल्याने खाली पडले असता मदतीला गेलेल्या नाटेकर यांच्यावरही बिबट्याने हल्ला केला. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या परिसरात हल्ला करणाऱ्या बिबट्याने याआधीही अनेक जणांवर हल्ला करून त्यांना जखमी केले आहे.वनविभागाने बिबट्याला पकडण्यासाठी मध्यंतरी पिंजरे व कॅमेरे लावले होते परंतु तरी देखील हा बिबट्या मात्र वनविभागाच्या जाळ्यात न येता गावकऱ्यांवर हल्ला करीत आहे. या बिबट्याचा आता तातडीने बंदोबस्त करा अशी संतप्त प्रतिक्रिया गावातील लोकांकडून व्यक्त केली जात आहे.
www.konkantoday.com