खाजगी ट्रॅव्हल्सवाल्यांना एस.टी. भाड्याच्या दीडपटच वाढ करता येणार
रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-पुण्याहून येणार्या अनेक खाजगी ट्रॅव्हल्स बसचालकांनी आपले तिकिटाचे दर प्रचंड वाढविले असून त्यामुळे प्रवाशांच्यात नाराजी निर्माण झाली होती. याबाबत आता उपप्रादेशिक परिवहन मंडळाने लक्ष घातले आहे. मात्र आता खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे संवर्गासाठी संपूर्ण बससाठी येणार्या प्रति की. मी. भाडेदराच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक भाडेवाढ करता येणार नाही. तसे झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी दिला आहे.
गर्दीच्या हंगामात खासगी बस चालकांकडून निश्चित केलेल्या प्रति कि.मी. भाडे दरापेक्षा अधिक भाडे कोणी आकारत नाही ना याची खातरजमा प्रवाशांनी करावी. तसे कोण करत असल्यास खात्याकडे तक्रार आल्यास त्या संबंधित ट्रॅव्हल्सविरूद्ध कारवाई केली जाणार आहे.
www.konkantoday.com